दुधी भोपळ्याचे वडे (Dudhi Bhopalyache Wade)
हिवाळा आला कि गरमागरम वडे व भजे यांची मेजवानी असते.
चला तर आज नवीन कुरकुरीत दुधी भोपळ्याचे वडे करूया!!!
साहित्य :
- दुधी भोपळा – १/२ किलो
- तांदळाचे पीठ – १/२ किलो
- हिरवी मिरची – ४, ५
- जिरे
- अद्रक – लसून
- धने पुड
- आमचुर पूड
- ओवा
- तीळ
- मीठ
- तेल
- साखर
- कोथिंबीर
कृती :
दुधी भोपळा पाण्याने धुवून, त्याचे साल काढून कीस करून घ्यावा. हिरवी मिरची, अद्रक, लसून, कोथिंबीर, जिरे यांचे वाटण करून घ्या. भोपळा कीस मधून पाणी काढून घ्या. त्यात हिरवी मिरची, अद्रक, लसून, जिरे यांचे वाटण, धने जिरे पुड, हळद कालवून घ्या. या कालवणात मीठ व साखर चवीप्रमाणे मिसळून घ्या. यात मावेल तेवढेच तांदळाचे पीठ मिसळून घ्या, सारण फार घट्ट भिजवु नये. त्यात तीळ व ओवा मिसळून घ्या. या मिश्रणातून छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे वडे थापून ते तेलात तळुन घ्या.
कुरकुरीत वडे तय्यार!!!
Nice one!