लबाबदार पनीर मखनी अशी बनवा | Paneer Makhani Recipe in Marathi
पनीर मखनी (Paneer Makhani) म्हणजे शाकाहारी जेवणातील एक आवडता पदार्थ. लहान मुलांचा अगदी आवडता आणि मोठाच्या मनात रुजलेला. चला तर मग, पनीर मखनी बनवुया !
पनीर मखनी (Paneer Makhani) – साहित्य
- पनीर : १/२ किलो
- बटर : ४ चमचे
- तेल : ३-४ चमचे
- लसूण : ५-६ पाकळ्या
- अद्रक : एक छोटा तुकडा
- कांदा : १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
- टमाटर : ४ मध्यम आकाराचे (बारीक चिरलेले)
- हिरवी मिरची : ४-५
- जिरे : २ चमचे
- इलायची : ३-४
- काश्मिरी लाल मिरची : २-३
- धने पावडर : १ चमचे
- हळद : १ चमचे
- गरम मसाला : १ चमचे
- मिठ : चवीनुसार
- कसुरी मेथी
- ताजे क्रीम
- काजू : १०-१२
- मध : १ चमचे
पनीर मखनी (Paneer Makhani) – कृती
मध्यम आचेवर कढई ठेवावी. त्यात जिरे, इलायची, लाल मिरची, चिरलेला लसूण, ठेचलेला अद्रक टाकून परतून घ्यावा. नंतर त्यात कांदा, टमाटर, काजू, धने पूड, हळद आणि मिठ घालून परतवून घ्या. कांदा छान गुलाबीसर झाला कि त्यात २ कप पाणी घालून २-३ मिनिटे शिजवून घ्या. १ चमचा गरम मसाला आणि १ चमचा बटर घालून आणखी ५-७ मिनिटे शिजवून घ्या.
Also Read
व्हेज मंचुरियन (Veg Manchurian)
शिजलेले मिश्रण थंड करून नंतर त्याची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी, आपला मखनी ग्रेव्ही बेस तय्यार!
कढईत १ चमचे बटर आणि १ चमचे तेल गरम करा. त्यात जिरे, बारीक चिरलेले अद्रक, चिरलेली हिरवी मिरची परतवून घ्या. यात पनीर चे तुकडे सोनेरी होईपर्यंत परतवून घ्या. (टीप : पनीर परवताना चिमूटभर मिठ घालावे). पनीर सोनेरी झाले कि काढून घ्या.
उरलेल्या तेलात २ चमचे लाल तिखट परतवून पूर्वी तयार केलेला मखनी ग्रेव्ही बेस गाळणी ने गाळून घालावा. हे मिश्रण २-४ मिनिटे शिजवून घ्यावे. आता त्यात १ कप पाणी घालून मिसळून घ्या, नंतर त्यात गरम मसाला, पनीर, कसुरी मेथी, मध आणि मिठ घालून मिक्स करून घ्या. मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करून २ मोठे चमचे ताजे क्रीम मिक्स करा. पनीर मखनी तय्यार!!!
पनीर मखनी (Paneer Makhani) सर्व्ह करताना वरून ताजे क्रीम आणि कोथिंबीर घालावी.