पटकन तय्यार होणारी गाजराची कोशिंबीर | Gajarachi Koshimbir Recipe in Marathi


कोशिंबीर म्हणजे विदर्भातील जेवणातला अविभाज्य घटक. रोजच्या जेवणात मुख्य पदार्थासोबत एक कोशिंबीर हि असलीच पाहिजे. आज आपण अशीच एक कोशिंबीर बघणार आहोत. करायला अगदी सोपी आणि कमीत कमी साहित्यात बनणारी. चला तर आज बनवूया पौष्टिक अशी गाजराची कोशिंबीर (Gajarachi Koshimbir).

Gajarachi Koshimbir
गाजराची कोशिंबीर (Gajarachi Koshimbir)

गाजराची कोशिंबीर (Gajarachi Koshimbir) – साहित्य

  • २ मध्यम आकाराचे गाजर
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा जिरे पुड
  • १/२ चमचा चाट मसाला
  • १/२ चमचा साखर
  • चवी प्रमाणे मिठ
  • २ लिंबाचा रस
  • १/४ चमचे हिंग
  • १/४ चमचे मोहरी
  • १/२ चमचे जिरे

कृती

गाजराची कोशिंबीर करायला सर्व प्रथम आपल्याला गाजर पाण्याने स्वछ धुवून घ्यायचे आहे. धुतलेले गाजर कोरड्या कापडाने पुसून घ्या. आता आपल्याला या गाजरांचा मध्यम आकाराचा किस करून घायचा आहे. किस मध्यम आकाराचा करावा कि बारीक करावा हे तुम्ही तुमच्या इच्छेने ठरवू शकता. पण या कोशिंबीरीला मध्यम आकाराचा किस सहसा उत्तम असतो.

Gajarachi Koshimbir
गाजरांचा मध्यम आकाराचा किस

आपले बाकी साहित्य जसे मिठ, साखर, लाल तिखट, चाट मसाला, जिरे पूड आणि लिंबांचा रस इत्यादी आपल्याला आता ह्या गाजराच्या किस मध्ये एकत्र करून घ्यायचे आहे.

Gajarachi Koshimbir
Gajarachi Koshimbir

वरील फोटोत दाखवल्या प्रमाणे जिरे, मोहरी आणि हिंग आपल्याला तडक्या साठी लागणार आहेत. तर तडक्या करिता तडका पॅन मध्ये १ चमचा तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यात जिरे, मोहिरी आणि हिंग टाकून गॅस बंद करून द्या. साहित्य टाकल्या नंतर लगेच गॅस बंद केला तर तडक जळत नाही.

Gajarachi Koshimbir

Also Read

झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा | Hiravya Mirchicha Thecha Recipe in Marathi


सर्व साहित्य आता चमच्याने एकत्र करून घ्या. लक्षात असू द्या कि तडका तेल गरम असल्याने आपल्याला हाताने मिक्स करायचे नाही, चमचा वापरायचा आहे.

Gajarachi Koshimbir
Gajarachi Koshimbir

आपली झटपट बनणारी गाजराची कोशिंबीर तय्यार आहे. कंमेंट सेक्शन मध्ये आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.

Gajarachi Koshimbir
गाजराची कोशिंबीर (Gajarachi Koshimbir)

You may also like...

1 Response

  1. Asmita Tomar says:

    Very Nice recipe.
    Thank u so much for delicious recipe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: