कुरकुरीत ब्रेड चीज बॉल्स असे बनवा | Bread Cheese Balls Recipe in Marathi


ब्रेड चीज बॉल्स (Bread Cheese Balls) ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. लहान मुलांसाठी ब्रेड चीज बॉल्स म्हणजे सर्वात आवडता पदार्थ. अर्थात त्यात चीज आहे म्हणून. तर आज आपण बनवूया ब्रेड चीज बॉल्स.

Bread Cheese Balls
Bread Cheese Balls

ब्रेड चीज बॉल्स (Bread Cheese Balls) – साहित्य

  • २ उकडलेले बटाटे (सोललेले)
  • ५ ते ६ ब्रेड
  • २ ते ३ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ माध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा
  • १०० ग्रॅम बारीक किसलेले पनीर
  • ३ ते ४ चीझ क्युब
  • १ बारीक चरलेले गाजर
  • १ चमचा अद्रक लसूण पेस्ट
  • १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट
  • १/२ चमचा जिरे पुड
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा चाट मसाला
  • १/३ चमचा चिली फ्लेक्स
  • चवीनुसार मिठ
  • १ लिंबाचा रस
  • कॉर्न फ्लेक्सचा चुरा
  • ५ चमचे कोरडा मैदा
  • ३ चमचे कॉर्न फ्लोअर

कृती

ब्रेड चीज बॉल्स बनवण्यासाठी आज आपण व्हाईट ब्रेड घेणार आहोत. तुम्ही यासाठी ब्राऊन ब्रेडचा पण वापर करू शकता. तर सर्वप्रथम ब्रेडच्या कडा चारही बाजूने आपल्याला कापून घायच्या आहेत, म्हणजे ब्रेडचा जो मधला नरम भाग आहे तोच आपण उपयोगात आणू . ब्रेडच्या कडा काढल्या नाहीत तर बॉल्स तळताना त्याचे टेक्सचर चांगले येत नाही आणि चीज बॉल्स फुटण्याची शक्यता असते.

Bread Cheese Balls
Bread Cheese Balls Preparation

आता आपण ब्रेड चीज बॉल्स बनवण्यासाठी सारण तयार करायला घेऊ. त्याकरता एका थाळी मध्ये उकडलेले बटाटे हाताने कुस्करून अथवा मोठ्या किसणीने किसुन घ्या. कुस्करलेल्या अथवा किसलेल्या बटाट्या मध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली फुलकोबी, किसलेले पनीर, बारीक चिरलेले गाजर आणि ब्रेडचे तुकडे टाकून सर्व साहित्य एकत्र मिसळुन घ्या. तय्यार मिश्रणामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत, एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, काश्मिरी लाल तिखट, जिरे पुड, चिली फ्लेक्स (Optional), निंबाचा रस, आणि चवीप्रमाणे मिठ टाकुन मिश्रण एकत्र करून घ्या.

Bread Cheese Balls
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls
Bread Cheese Balls Preparation

लक्षात असू द्या, हे सारण बनवताना आपण पाण्याचा किंचितही वापर करणार नाही आहोत. आपल्या भाज्यांची जी आर्द्रता आहे तीच आपल्याला या सारणाच्या साठी वापरायची आहे. सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर त्याचे माध्यम आकाराचे गोल गोळे बनवून घ्या. गोळे बनवल्यानंतर अंगठ्याने त्या गोळ्याच्या मध्यभागी एक छिद्र करायचे आहे. एका चीझ क्युब चे ६ तुकडे करून घ्या. आता प्रत्येक गोळ्यांमध्ये एक तुकडा टाकुन (फोटो दाखवल्याप्रमाणे) गोळा मोदकाला जसा बंद करतो तसं त्याचं तोंड बंद करून हाताने गोल गोळे तयार करून घ्या.

Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation

आता आपण टाळण्यासाठी गोळे तयार करून घेऊया. चीझ बॉल्स च्या कोटिंग साठी इथे आपण कॉर्न-फ्लेक्सचा चुरा वापरणार आहोत. एक वाटी कॉर्न-फ्लेक्स घेऊन ते हातानेच कुस्करून त्याचा जाडसर असा चुरा तयार करून घ्या. तुम्ही जर ते मिक्सरमधून काढले तर त्याची एकदम पावडर होईल, ते आपल्याला नको आहे. इथे त्याचा जाडसर चुराच हवा आहे, तर शक्यतो हातानेच त्याचा जाडसर असा चुरा करून घ्या.


Also Read,

घरच्याघरी कुरकुरीत व्हेजिटेबल कटलेट असे बनवा | Crispy Vegetable Cutlet Recipe in Marathi


ब्रेड चीज बॉल्स कोटिंगची प्रक्रिया तीन स्टेजमध्ये करायची आहे. तर पहिल्या स्टेजमध्ये कोरडा मैदा, दुसऱ्या स्टेजमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी, आणि तिसऱ्या स्टेजमध्ये कॉर्न-फ्लेक्सचा चुरा असं आपण वापरणार आहोत. आपण जे गोळे तयार करून घेतले होते, त्यातील एक गोळा घेऊन त्याला पूर्णपणे कोरड्या मैद्याने कव्हर करा (खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे). पूर्ण मैद्याने कव्हर झाल्यावर हलक्या हाताने त्यावर जो अतिरिक्त मैदा तो आहे तो काढून टाका. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला त्याला मैदा आणि कॉर्न फ्लोअर सारणाचे कोटिंग करायचं आहे. त्यासाठी आपण जे मैदा-कॉर्न फ्लोअर चे सारण तयार केले आहे त्यामध्ये गोळे टाकून त्याला पूर्णपणे कव्हर करून घ्या. आता हे कव्हर केलेले गोळे आपल्याला कॉर्न-फ्लेक्सच्या चुऱ्या मध्ये कव्हर करून घ्यायचे आहे. अतिरिक्त चुरा जो आहे तो तुम्ही थोडा हलक्या हाताने काढून घेऊ शकता. असेच आपल्याला आता सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत.

Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation

ब्रेड चीज बॉल्सचे हे तय्यार गोळे तुम्ही असेच जर डीप फ्रीजर मध्ये टाकून ठेवले तर ते दोन ते तीन दिवसापर्यंत चांगले राहतात. आता आपल्याला हे ब्रेड चीज बॉल्स तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एका वेळेला तीन ते पाच असे ब्रेड चीज बॉल्स टाकून तळुन घ्या. पण लक्ष असू द्या कि खूप सारे ब्रेड चीज बॉल्स एकत्र टाकून कढईमध्ये गर्दी करू नका, अन्यथा ते फुटू शकतात.

Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation
Bread Cheese Balls Preparation

मिडीयम आचेवर हे ब्रेड चीज बॉल्स गोल्डन ब्राउन होई पर्यंत तळून घ्या. तळलेले ब्रेड चीज बॉल्स एक थाळी मध्ये टिशु पेपर वर काढून घ्या. आपले ब्रेड चीज बॉल्स हे तय्यार आहेत.

Bread Cheese Balls
Bread Cheese Balls

तुम्हाला हि रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कंमेंट सेकशन द्वारे जरूर कळवा.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: