कैरीचा तक्कु (Kairicha Takku)
उन्हाळा आला की येतो आंबा आणि आंब्याच्या विविध पदार्थांची मेजवानी!!!
आज आपण करूया कच्च्या आंब्याचा अर्थात कैरीचा तक्कु.
साहित्य
- मध्यम आकाराच्या कैऱ्या : २
- चवीपुरते मिठ
- लाल तिखट : १ चमचा
- गुळ : ०.५ कप
- जिर पुड : १ चमचा
- हळद : ०.५ चमचा
कृती
प्रथम कैऱ्या पाण्याने धुवून घ्या. बारीक किसणीने कैरीचा कीस करून घ्या. त्यात मिठ, लाल तिखट, गुळ, जिरं पूड, आणि हळद कालवून घ्या.
कच्च्या आंब्याचा अर्थात कैरीचा तक्कु तय्यार!!!
तय्यार तक्कु ३ ते ४ दिवस छान राहतो.