झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा | Hiravya Mirchicha Thecha Recipe in Marathi
झणझणीत ठेचा सर्वांनाच आवडतो. कधी भाकरी बरोबर तर कधी चटणी म्हणून. चला तर झटपट बनवुया हिरव्या मिरच्यांचा ठेचा.
साहित्य
- हिरवी मिरची – २५० gm
- लिंब – ३
- लसूण – २० ते २५ पाकळ्या
- कोथिंबीर
- हिंग
- जिरे – ३ चमचे
- साखर – १ चमचा
- मिठ
- तेल – १०० gm
कृती
प्रथम मिरच्या पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्याव्यात. खूप तिखट मिरची घेऊ नये.
मिरचीचे बारीक तुकडे करावे, नंतर मिरचीचे तुकडे, जिरे, लसूण व कोथिंबीर खलबत्या मध्ये कुटून घ्यावे. हे वाटण मिक्सर मध्ये पण काढता येईल पण खलबत्यातला ठेचा उत्तम लागतो.
छोट्या कढईत तेल गरम करावे, त्यात १/२ चमचा जिरे, १/२ चमचा हिंग टाकावा. लगेचच तयार केलेले वतन टाकून ४ ते ५ मिनिटे परतवाव. त्यात ३/४ चमचे मिठ घालुन परतावं आणि Gas बंद करावा.
ठेच्या मध्ये साखर आणि लिंबांचा रस टाकून सर्व सारण एकत्र मिक्स करावे.
हिरव्या मिरचीचा ठेचा तय्यार!!!