विदर्भ स्पेशल चमचमीत आंबट बेसन | Aambat Besan Recipe in Marathi
बेसन म्हणजे कधीही कुठेही झटपट तय्यार होणारा पदार्थ. बेसन खूप काही पद्धतीने तय्यार करता येत आणि तसे त्याचे अनेक नाव सुद्धा आहेत, जसे झुणका किंवा पिठलं किंवा चुन आणि बरेच काही. आज आपण दह्याचे आंबट बेसन (Aambat Besan) कसे बनवायचे ते बघूया.

आंबट बेसन (Aambat Besan) – साहित्य
- बेसन – १ वाटी
- आंबट दही – २ वाटी
- लसुण पाकळ्या – ५
- हिरव्या मिरच्या – ४
- जिरे – १/२ चमचा
- मोहरी – १/४ चमचा
- हिंग
- हळद – १/२ चमचा
- मिठ – चवीनुसार
- तेल – २ ते ३ चमचे
- बेसन भिजवायला पाणी
आंबट बेसन (Aambat Besan) – कृती
प्रथम दही रवीने फेटून घ्या, दही छान एकजीव झाले की त्यात बेसन घालून फेटून घ्या. नंतर थोडं मिठ, हळद व गरजेनुसार पाणी घालून चांगले फेटून घ्या. सारण अति पातळ नको, नाहीतर आंबट बेसन पांचट होईल. फेटाळले मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा.
गॅस वर कढई गरम करायला घ्या. कढईत तेल घालून गरम करून घ्या. तेल गरम झाले की त्यात जिरे, मोहरी, हिंग, बारीक लसुण काप घालून परतुन घ्या. लसुण लालसर झाले की त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून परतावे. मिरची झाली की त्यात बेसन दही मिश्रण घालून चांगले हलवून घ्या. बेसन एकजीव शिजण्या साठी २-३ मिनिटे छान चमच्याने हलवत राहावे. जर फार आंबट चव आवडत नसेल तर एक तुकडा गुळाचा घालावा, गुळाने चव छान येते.
Also Read
दही भेंडी (Dahi Bhendi)
बेसन ५ ते ६ मिनिटे खद खद उकळून घ्या. नंतर गॅस बंद करून काही मिनिटे तय्यार बेसन झाकून ठेवा. आपले आंबट बेसन तय्यार! सर्व करताना वरून कोथिंबीर घालावी. आंबट बेसन ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते.
टीप : थोडं झणझणीत खायला आवडत असेल तर पॅन मध्ये २-३ चमचे तेल गरम करून, त्यात जिरे आणि २-३ चमचे तिखट तळून घ्यावे. हे तळलेले तिखट आंबट बेसनाच्या वर घालून खायला अतिशय चांगले लागतें.