चमचमीत बटाटा वडा असा बनवा | Batata Vada Recipe in Marathi


बटाटा वडा (Batata Vada) म्हटलं कि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. संपुर्ण महाराष्ट्रात आपल्याला बटाटा वडा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतो. मुंबई-पुणे-नाशिक म्हटलं कि वडा पाव, नागपूर किंवा विदर्भ एरिया म्हटलं कि तर्री बटाटा वडा, आणि चंद्रपूर किंवा यवतमाळ एरिया म्हटलं कि आलुबोन्डा. बटाटा वडा बनवण्याची पद्धत सर्वत्र ९०% एकच, फक्त तो खायला देतांना विविध पद्धतीने सर्व्ह करतात. सगळ्यात सोपं म्हणजे बटाटा वडा आणि तळलेली हिरवी मिरची. चला तर वेळ वाया न घालवता बनवूया विदर्भ स्पेशल बटाटा वडा.

Batata Vada
बटाटा वडा (Batata Vada)

बटाटा वडा (Batata Vada) – साहित्य

  • ४ – ५ उकडलेले बटाटे
  • २ बारीक कापलेले मध्यम आकाराचे कांदे
  • ४ – ५ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
  • २ चमचे अद्रक-लसुण पेस्ट
  • २ चमचे बेसन (बटाटा सारण साठी)
  • १ चमचा लाल तिखट
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा जिरे पुड
  • १/२ चमचा धने पुड
  • २ चमचे सोपं-धने भरड
  • १/२ चमचा कस्तुरी मेथी
  • १/२ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा चाट मसाला
  • १/४ चमचे हिंग
  • १/२ चमचा जिरे
  • १/२ चमचा मोहरी
  • चवीप्रमाणे मिठ
  • १/४ चमचा साखर
  • २ कप बेसन
  • ३ चमचे तांदुळ पिठ
  • १/४ चमचे ओवा

कृती

बटाटा वडा (Batata Vada) बनवण्या करीता सर्वप्रथम आपण बटाटाचे सारण बनवुया. सारणासाठी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे सोपं व धने दाणे यांचे भरड. ते तयार करण्यासाठी १ चमचे जाडी सोपं आणि १ चमचे धने दाणे घेऊन ते खलबत्त्यात जाडसर कुटून घायचे आहे. लक्षात असू द्या कि आपल्याला सोपं – धने दाण्याची भरड हवी आहे, पुड नको.

Batata Vada
साहित्य १
Batata Vada
साहित्य २
Batata Vada
साहित्य ३

आता आपण मुख्य बटाटा वडा सारण बनवायला घेऊ. गॅस वर कढई मध्ये २ – ३ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यात हिंग, जिरे आणि मोहरी टाकुन तडतडुन घ्या (Step 1). जिरे – मोहरी छान तडतडले की त्यात बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून परतवुन घ्या (Step 2). कांदे हलकेसे परतवून झाले कि त्यात अद्रक-लसुण पेस्ट टाका आणि परतवुन घ्या (Step 3). कांदे छान गुलाबीसर झालेत कि त्यात हळद, लाल तिखट, जिरे पुड, धने पुड, सोप-धने भरड, आणि चाट मसाला टाकून एकत्र करून घ्या (Step 4).

Batata Vada
Step 2
Batata Vada
Step 4
Batata Vada
Step 5

Also Read

पटकन तय्यार होणारी गाजराची कोशिंबीर | Gajarachi Koshimbir Recipe in Marathi


या मसाल्याला थोडं तेल सुटलं कि त्यात आपल्याला २ चमचे बेसन टाकायचे आहे (Step 5). बेसन आपण इथे सारणाला बाइंडिंग यावी म्हणुन टाकत आहोत. बेसन छान मसाल्यामध्ये खमंग भाजून घ्या. बेसन भाजुन झाले कि त्यात उकडलेले बटाटे हाताने कुस्करून टाका आणि सर्व सारण एकत्र मिक्स करून घ्या (Step 6). या सारणाला आपल्याला १ मिनिटे परतवून घायचे आहे व नंतर ३ मिनिटे कढई वर झाकण ठेऊन, गॅस मंद आचेवर करून छान वाफ काढून घ्यायची आहे (Step 7). मध्ये मध्ये झाकण काढून चेक करत राहा, म्हणजे सारण कढईला लागणार नाही.

Batata Vada
Step 6
Batata Vada
Step 7
Batata Vada
Step 9

एक वाफ काढून झाली कि सारणामध्ये आता चवीप्रमाणे मिठ, थोडी साखर, कस्तुरी मेथी आणि गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्या (Step 8). गॅस बंद करून तय्यार सारण एक थाळी मध्ये थंड करायला काढून घ्या (Step 9).

बटाट्याचे सारण थंड होई पर्यंत आपण बेसन तय्यार करायला घेऊ. त्याकरीता एक भांड्यात २ कप बेसन, ३ चमचे तांदुळ पिठ, थोडी हळद, चवीपुरते मिठ आणि ओवा टाकून मिक्स करून घ्या (Step 10). बेसन आणि तांदुळ पिठ बारीक चाळणीने चाळुन घेणे कधीही उत्तम. हे मिश्रण आपल्याला आता थोडे थोडे पाणी टाकून भिजवायचे आहे. या मिश्रणात पाणी टाकतांना एक हाताने सारखं फेटत राहावे, म्हणजे छान एकजिव मिश्रण होईल (Step 11). या भिजवलेल्या बेसनाची सुसंगतता (Consistency) फोटोत दाखवल्याप्रमाणे असायला हवी (Step 12).

Batata Vada
Step 10
Batata Vada
Step 11
Batata Vada
Step 12

थंड झालेल्या बटाट्याच्या सारणाचे आपल्याला आता बटाटा वडा साठी गोळे करून घ्यायचे आहे (Step 13). गोळ्यांचा आकार तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे करू शकता. माध्यम आकाराचे गोळे करणे कधीही उत्तम. गोळे तय्यार झाले कि ३ ते ५ एक वेळी असे ते भिजवलेल्या बेसनात टाकून (Step 14), गोळ्यांवर छान बेसनाची परत करून घ्या (Step 15).

Batata Vada
Step 13
Batata Vada
Step 14
Batata Vada
Step 15

आता आपल्याला बटाटे वडे तळायला घायचे आहे, त्याकरता कढईत तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यात बेसनाने कव्हर केलेले बटाट्याच्या सारणाचे गोळे टाकुन माध्यम आचेवर तळुन घ्या (Step 16). बटाटे वडे सर्व बाजुने छान लालसर तळले कि एका प्लेट मध्ये टिश्यू पेपर ठेऊन त्यावर काढून घ्या (Step 17).

Batata Vada
Step 16
Batata Vada
Step 17

आपले गरमागरम बटाटे वडे तय्यार. बटाटे वडे तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे खाऊ शकता, जसे कि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत, किंवा फोडणीच्या ताकासोबत, किंवा तर्री रस्सा सोबत. बच्चे कंपनी ला तर टोमॅटो सॉस सोबत पण बटाटे वडे आवडतात.

Fodaniche Tak
फोडणीचे ताक
Batata Vada
बटाटा वडा आणि फोडणीचे ताक

कशी वाटली तुम्हाला हि रेसिपी हे आम्हाला कंमेंट सेकशन द्वारे जरूर कळवा.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: