पौष्टीक गव्हाची उकडपेंडी / उपमा असा बनवा | Gavhachi Ukadpendi Recipe in Marathi


गव्हाची उकडपेंडी (Gavhachi Ukadpendi) अथवा उपमा म्हणजे छोटी भुक भागवण्यासाठी उत्तम पर्याय. बनवायला अगदी सोपी आणि चवीला उत्कृष्ट, ज्याची काही न्यारी औरचं ! लहान मुलांच्या टिफिन साठी तर सर्वोत्तम उपाय. मग वेळ कशाला घालवता, चला तर बनवूया गव्हाची उकडपेंडी.

Gavhachi Ukadpendiसाहित्य

  • १ कप गव्हाचे पिठं
  • १.५ कप गरम पाणी
  • १ मध्यम आकाराचा कांदा
  • चवीप्रमाणे मिठ
  • ४ चमचे दही
  • १ चमचा साखर
  • ०.५ चमचे हळद
  • ०.५ चमचे लाल तिखट
  • ४ चमचे तेल
  • फ़ोडणी साठी जिरे, मोहरी आणि हिंग

कृती

कांदा बारीक कापुन घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी आणि हिंग घाला. जिरे मोहोरी तडतडली की त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा लालसर होईस्तोवर परतुन घ्या. सोबत दुसऱ्या शेगडी वर पाणी गरम करायला ठेवा. कांदा लालसर झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि मिठ घालून परतुन घ्या. नंतर त्यात गव्हाचं पिठ घालून लालसर भाजून घ्या, खमंग सुवास येई पर्यंत.

आता त्यात प्रथम दही घाला आणि चांगलं मिळवून घ्या. आपलं सारण चॅन एकजीव झालं कि नंतर त्यात गरम पाणी घालून सारख ढवळत राहा. पिठाच्या गुठळ्या नाही होणार याची काळजी घ्या आणि त्यासाठीच सारखा चमच्याने मिश्रण ढवळत राहा. पीठ छान घट्ट झाले की त्याला ३-४ मिनिटे झाकण लावून, कमी आचेवर एक वाफ काढून घ्या.

आपली खमंग उकडपेंडी तय्यार ☺️. गरमागरम गव्हाची उकडपेंडी आणि वरून छान दही घालून खायला द्यावी.


Also Read

विदर्भ स्पेशल चमचमीत आंबट बेसन | Aambat Besan Recipe in Marathi


टीप – दही नको असल्यास लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. उकडपेंडी खायला देतांना वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: