स्वादिष्ट इडली सांभर अगदी सोपी पद्धत | Idli Sambar Recipe in Marathi
इडली सांभर (Idli Sambar) म्हणजे वर्ल्ड फेमस ब्रेकफास्ट. जगात कुठेही गेलात तरी काही मिळो ना मिळो पण इडली सांभर नक्की मिळणारच. इडली सांभर हा लहान ते मोठी मंडळी संवांच्या आवडीचा पदार्थ. पचायला हलका आणि मन तृप्त करणारा. चला तर, बनवुया इडली सांभर.

इडली सांभर (Idli Sambar) – साहित्य
- इडली पिठ (बॅटर) साठी
- उडद डाळ – १/२ कप
- इडली तांदुळ – १.५ कप
- मेथी दाणे – १/२ चमचा
- मिठ – चवी प्रमाणे
- सांभर साठी
- तेल – ६ चमचे (सांभर + तडका)
- हिंग
- मोहरी दाणे – १ चमचा
- जिरे – १ चमचा
- उडद डाळ – १ चमचा
- चना डाळ – १ चमचा
- काळे मिरे – १ चमचा
- मेथी दाणे – १ चमचा
- धने दाणे – २ चमचे
- कडीपत्ता – १२/१५ पाने
- काश्मिरी लाल मिरची – १०/१२
- हिरवी मिरची – २/३
- ताजे किसलेले नारळ – १/४ कप
- लसुण – २/३
- अद्रक – १ तुकडा
- तूर डाळ – १ कप
- हळद पुड – अर्धा चमचा
- लाल तिखट – १ चमचा
- मिठ
- कांदे – २ मध्यम बारीक चिरलेले
- टमाटर – २ मध्यम बारीक चिरलेले
- गुळ – २ ते ४ तुकडे
- शेवगा शेंगा – १०/१२ एक इंच तुकडे
- चिंचेचं पाणी – २ ते ३ मोठे चमचे
- छोटे मद्रास कांदे (बटण कांदे) – २/३
- कोहळं – ५ ते ८ छोटे तुकडे (Optional)
इडली सांभर (Idli Sambar) – कृती
प्रथम आपण इडली पीठ बनवुन घेउया. त्यासाठी उडद डाळ आणि तांदुळ वेगवेगळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. उकडा तांदुळ किंवा इडली तांदुळ वापराने सर्वात चांगले. धुतलेले तांदुळ आणि उडद डाळ वेगवेगळे पाण्यात २ ते ३ तास भिजवून ठेवा. भिजवताना पाणी तांदुळ आणि डाळीच्या वर पर्यंत येईल याची काळजी घ्या. तांदुळ भिजवताना त्यात थोडे मेथी दाणे टाकावे. २ ते ३ तासांनी उडद डाळीतले पाणी काढून डाळ ग्राइंडर मधून बारीक करून घ्या. डाळ बारीक करतांना गरज भासल्यास ४ ते ५ चमचे पाणी घालू शकता. छान एकजीव डाळ पिठ झाले कि ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. आता भिजलेले तांदुळ सुद्धा याच प्रकारे ग्राइंडर मध्ये बारीक करून घ्या. लक्षात असू द्या, आपल्याला तांदूळ पीठ जाडसर बारीक करायचे आहे, उडद डाळ पिठासारखे एकजीव नको. जाडसर बारीक झालेले तांदुळ, उडद डाळ पिठासोबत एकत्र मिसळुन घ्या. हे तय्यार मिश्रण उबदार जागी ८-१० तास झाकुन ठेवा.



टीप : जर इडल्या भरपूर प्रमाणात करायच्या असतील तर उडद डाळ आणि तांदुळ नेहमी १:३ प्रमाणाने वाढवावे.
Also Read
दही भेंडी (Dahi Bhendi)
८-१० तासांनी इडली मिश्रण छान फरमन्ट झालेले असेल. यात चवीप्रमाणे मिठ टाकून मिक्स करून घ्या. शेगडी वर इडली पात्र पाणी टाकून गरम करायला ठेवून घ्या. इडली पात्राच्या प्लेट ला तेल किंवा तूप लावून त्यात प्रत्येक खाच्या मध्ये तीन चतुर्थांश इडली मिश्रण टाकून घ्या.


इडली खाचे पुर्ण भरू नये कारण इडली शिजल्यावर आकाराने मोठी होईल. इडलीला छान ७ ते ८ मिनिटे वाफ काढून घ्या, त्या पेक्षा जास्त नको. ज्यास्त वेळ वाफ (Steam) काढल्याने इडली कडक होईल. ७ ते ८ मिनिटांनी इडली मध्ये टूथपिक किंवा चाकू टाकून चेक करून घ्यावे, टूथपिक एकदम साफ निघायला हवी. झालं तर, आपली नरम इडली तय्यार! झालेल्या इडल्या वेगळ्या भांड्यात काढून घ्या.


आता आपण संभार करायला घेऊ.
प्रथम सांभर मसाला पेस्ट बनवूया. गॅस वर कढई ठेऊन त्यात २ चमचे तेल गरम करून घ्या. त्यात हिंग, मोहरी, जिरे, उडद डाळ, चना डाळ, काळे मिरे, मेथी दाणे आणि धने दाणे घालून छान २-३ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. यात आता कडीपत्ता, लाल मिरची, किसलेले ताजे नारळ, अद्रक, लसूण, छोटे मद्रास कांदे (बटण कांदे) व हिरवी मिरची घालून परत २-३ मिनिटे परतून घ्या. तय्यार मिश्रण एक भांड्यात काढून थंड करून घ्या. थंड मिश्रणाची ग्राइंडर मध्ये थोडं पाणी घालून छान एकजीव पेस्ट करून घ्या. आपली सांभर मसाला पेस्ट तय्यार!
सांभर बनवण्यासाठी तूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतलेली डाळ २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. भिजलेली तूर डाळ, थोडी हळद घालून कुकर मध्ये ३-४ शिट्या काढून शिजवून घ्या. आपले साधे तूर डाळीचे वरण तय्यार! आता पॅन मध्ये १-२ चमचे तेल गरम करून, त्यात मोहरी, जिरे आणि बारीक कापलेले कांदे घालून २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात कापलेले टमाटर, हळद आणि लाल तिखट घालून २ मिनिटे परतून घ्या. मिश्रणात आता २-३ मग गरम पाणी घालून एक उकळी काढून घ्या. या मिश्रणात शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, कोहळ्याचे तुकडे, माध्यम कापलेले कांदे, चिंचेचे पाणी, गुळ आणि मिठ घालून मिक्स करा व छान उकळून घ्या. एक उकळी आली की त्यात आपला तय्यार ओला सांभर मसाला घालून मिक्स करून घ्या. सांभर मंद आचेवर १५-२० मिनिटे होऊ द्या, म्हणजे सर्व भाज्या छान शिजून जातील. या सांभरला वरून हिंग, मोहरी, काडिपत्त्याचा तडक द्या. आपला सांभर तय्यार! आवडीप्रमाणे तुम्ही गुळ व चिंचेचे पाणी कमी जास्त करू शकता.

सर्व्ह करतांना इडली आणि सांभर वेगवेगळे देऊ शकता किंवा इडली वर सांभर टाकून सुद्धा देऊ शकता. खरं तर सांभर मध्ये पूर्ण बुडालेली इडली आणि चटणी खाण्याची बात काही औरचं! तुम्हाला इडली सांभर (Idli Sambar) कसा खायला आवडतो ते कंमेंट सेकशन मध्ये मेंशन करा.
