चटकदार आणि खमंग लाल मिरचीचा ठेचा | Lal Mirchicha Thecha Recipe in Marathi


मिरचीचा ठेचा म्हटलं कि आठवण येते ती भाकरी, त्यावर ठेचा आणि तेल, सोबत मस्त एक कांदा ! वाह ! या पूर्वी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते बघितले, आज आपण पाहूया लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha) कसा बनवायचा ते.

Lal Mirchicha Thecha Moreyskitchen
Lal Mirchicha Thecha

लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha)साहित्य

  • २५ – ३० लाल मिरच्या
  • १ गाठा लसुण
  • जिरे – १ चमचा
  • २ लिंबांचा रस
  • पिवळी मोहरी डाळ – १ चमचा
  • मेथी दाणे – १/४ चमचा
  • हिंग – १/४ चमचा
  • खायचे तेल – १ वाटी
  • मिठ – चवीनुसार

लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha)कृती

प्रथम मिरची, जिरे आणि लसुण बारीक वाटून घ्या, तुम्ही मिक्सर मध्ये वाटण करू शकता किंवा दगडी पाट वरवंटा वापरला तर फारच चांगले. पाट्या वरवंट्या वरच्या वाटाचणी चव काही न्यारीच ! सोबतच मेथी दाने, पिवळी मोहरी डाळ एक चमचा तेलात खमंग परतून घ्या व त्यांचे वाटण करून घ्या.

शेगडी वर कढईत १ वाटी तेल गरम करायला घ्या, या ठेच्याला तेल जरा जास्तच लागतं, तर संकोच नको. तेल गरम झाले कि, शेगडी ची आच मंद करावी. नंतर त्यात हिंग आणि मेथी मोहरी वाटण परतून घ्या. त्यात लगेच मिरचीचे वाटण घालून परतून घ्या. चवीपुरते मीठ घालून संपूर्ण ठेचा ५ – ७ मिनिटे मंद आचेवर छान परतून घ्या.

Also Read

हिरव्या मिरचीचा ठेचा (Hirawya Mirchicha Thecha)

आता त्यात २ लिंबाचा रस घालून थोडं परतून घ्या. आपला लाल मिरचीचा ठेचा (Lal Mirchicha Thecha) तय्यार !

हा लाल मिरचीचा ठेचा १५ – २० दिवस एअर-टाइट डब्ब्यात छान राहतो.

टीप : सर्व करतांना ठेच्यावर थोडं तेल घालावे.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: