स्वादिष्ट रवा उपमा असा बनवा | Rava Upma Recipe in Marathi
सर्वात हलका फुलका नाश्ता म्हणजे रवा उपमा (Rava Upma). बनतोही झटपट आणि संपतोही पटपट. चला तर बनवूया रव्याचा उपमा.
रवा उपमा (Rava Upma) – साहित्य
- बारीक रवा – २५० gm
- हिरवी मिरची – ४ ते ५
- कांदे – २
- दही – ४ ते ५ चमचे
- जिरे – १/४ चमचा
- हळद – १/२ चमचा
- हिंग – १/४ चमचा
- मिठ – चवीनुसार
- साखर – १/४ चमचा
- कडीपत्ता
- तेल – ३ ते ४ चमचे
कृती
प्रथम कांदे आणि हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्याव्या. गॅस वर कढई गरम करायला ठेवावी. कढई गरम झाली कि त्यात रवा भाजून घ्यावा. रवा भाजतांना खूप लाल होऊ देऊ नये. भाजलेला रवा ताटात काढून घ्यावा.
कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे, हिंग, कडीपत्ता आणि मिरची परतवून घ्यावी. नंतर त्यात कांदे परतवून घ्यावे. कांदे होत असतांना त्यात हळद घालावी. कांदे सोनेरी झाल्यावर त्यात भाजलेला रवा घालावा आणि २-३ मिनिटे परतून घ्यावा.
Also Read
कांदे पोहे | Kande Pohe Recipe in Marathi
नंतर त्यात दही, साखर आणि मिठ घालावे आणि पाण्याचा फुलवा मारवा. उपमा मोकळा होई पर्यंत चमच्याने हलवत राहावे. उपमा मोकळा झाल्यावर गॅस बंद करावा. उपमा तय्यार!!!
उपमा Serv करतांना त्यावर कोथिंबीर व खोबरं किस घालावा.