चमचमीत शेंगदाणे लसूण चटणी अशी बनवा | Shengdane Lasun Chutney Recipe in Marathi
शेंगदाणे लसूण चटणी (Shengdane Lasun Chutney) म्हणजे चटणी प्रकारातला ऑल राउंडर. झुणका भाकर म्हणा, पिठलं म्हणा, थालपीठ म्हणा की अगदी साधा भात, ही चटणी कशा सोबत पण उत्तम लागते.
शेंगदाणे लसूण चटणी (Shengdane Lasun Chutney) – साहित्य
- २५-३० लसूण पाकळ्या
- ०.५ कप शेंगदाणे
- १०-१२ लाल मिरच्या
- १ चमचा जिरे
- ३ चमचे तेल
- चवीनुसार मीठ
शेंगदाणे लसूण चटणी (Shengdane Lasun Chutney) – कृती
प्रथम कढईत तेल गरम करा, त्यात शेंगदाणे भाजून घ्यावे. शेंगदाणे भाजून झाले की काढून घ्या आणि त्याचं तेलात मिरच्या भाजून घ्या, लक्ष असू द्या की मिरच्या जळणार नाहीत. भाजलेल्या मिरच्या काढून घ्या.
Also Read
तिळाची चटणी (Tilachi Chutney)
भाजलेले शेंगदाणे, लाल मिरची, जिरे आणि मिठ मिक्स करून मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यावे. गरज भासल्यास त्यात थोडे तेल टाका.
खमंग शेंगदाणे लसूण चटणी (Shengdane Lasun Chutney) तय्यार ☺️.