आरोग्यवर्धक शेपूची भाजी अशी बनवा | Shepuchi Bhaji Recipe in Marathi
शेपुची भाजी (Shepuchi Bhaji) हि फार आरोग्यवर्धक आहे. हाथ-पाय दुखणे, सांधेदुखी इत्यादि मध्ये शेपूची भाजी अत्यंत प्रभावकारी आहे. शेपूची भाजी सहसा विदर्भ परिसरात आपल्याला पाहायला मिळते. एक गोष्ट इथे महत्वाची आहे कि या भाजीला उग्र असा वास असतो, म्हणुन ती बनवायची पद्धत थोडी विशेष आहे, जेणे करून तय्यार भाजी ला तो उग्र वास नसणार. मग चला तर, बनवुया आपली शेपूची भाजी.
Shepuchi Bhaji – साहित्य
- १ पाव शेपु
- १०० ग्रॅम भिजलेली मुंगडाळ
- ४ – ५ लसणाच्या पाकळ्या
- २ – ३ लाल मिरच्या
- तेल
- जिरे
- मिठ
- हळद
- हिंग
कृति
प्रथम शेपू साफ करुन घ्या. साफ केलेला शेपू २ ते ३ पाण्याने स्वछ धुवून घ्या. धुतलेला शेपू साफ कोरड्या कापडावर पसरवून घ्यावा जेणेकरून अतिरिक्तं पाणी निघून जाईल. भिजलेली मुगाची डाळ सुध्या दुसऱ्या एका साफ कोरड्या कापडावर पसरवून घ्या.
कढईत २ चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यात जिरे आणि बारीक लसणाच्या पाकळ्या टाका. लसणाच्या पाकळ्या छान लालसर झाल्यावर त्यात हिंग आणि लाल मिरच्या (हाताने तोडुन) घाला. लाल मिरच्या छान भाजल्यावर नंतर त्यात हळद आणि शेपु टाकून छान परतून घ्या. या भाजीला थोडा वेळ सारखं परतवत राहावं लागत, जेणेकरून भाजी लागणार नाही आणि लसूण लाल मिरची सोबत परतल्याने शेपूचा उग्र वास निघून जाईल.
Also Read
विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्यांची आमटी | Turichya Danyachi Aamati Recipe in Marathi
शेपू चे मिश्रण छान परतवून झाले कि त्याला १ ते २ मिनिटे वाफ येऊ द्या. २ मिनिटं नंतर झाकण काढून भाजी एकत्र मिक्स करून त्यात मीठ आणि भिजलेली मुंगडाळ टाकून मंद आचेवर अजून १ ते २ मिनिटे वाफ काढून घ्या.
आपली स्वादिष्ट शेपूची भाजी तय्यार. तुम्ही जर लक्षपूर्वक पहिले असेल तर तुमच्या ध्यानी आलेच असेल कि या भाजीला अगदी कमी साहित्य लागत. आणि भाजी करतांना सुद्धा आपण एकदूम कमी तेलाचा उपयोग केला आहे.
सर्विंग साठी भाजी एका बाउल मध्ये काढून वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.