स्वादिष्ट तिळाची चटणी अशी बनवा | Tilachi Chutney Recipe in Marathi


सुक्या चटण्या म्हणजे नेहमीच्या जेवणाला एक चवदार सोबत. तिळाची चटणी हि थालपीठ, धपाटे, पराठे सोबत छान लागते. चला तर बनवुया तिळाची चटणी (Tilachi Chutney).

Tilachi Chutney
Tilachi Chutney

तिळाची चटणी (Tilachi Chutney)साहित्य

  • १ वाटी तीळ
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या
  • २ लाल मिरच्या
  • जिरे – १ चमचा
  • मिठ – चवीनुसार
  • साखर – चवीनुसार
  • तेल – १/२ चमचा

कृती

तिळाची चटणी करण्यासाठी आपल्याला प्रथम तीळ भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही तीळ आणि बाकी साहित्य सोबत भाजू शकता किंवा वेगवेगळे सुद्धा भाजु शकता. आपण इथे सर्व साहित्य सोबत भाजणार आहोत. त्याकरीता गॅस वर कढई मध्ये १/२ चमचा तेल गरम करा. तेल गरम झाले कि त्यात जिरे तडतडून घ्या. जिरे तडतडले कि त्यात लाल मिरची, आणि लसूण भाजून घ्या.

मिरची व लसूण छान भाजले गेलेत कि त्यात आता तीळ टाकून ते भाजुन घ्या. लक्षात असू द्या कि हे मिश्रण आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचे आहे, अन्यथा साहित्य अती-भाजले जाईल अथवा जळुन जाईल, ते आपल्याला नको आहे. भाजण्याचा खमंग सुवास सुटेपर्यंत सर्व मिश्रण भाजून घ्या. भाजण्याचा खमंग सुवास सुटला कि गॅस बंद करून हे मिश्रण एका थाळी मध्ये थंड करायला काढून घ्या.

मिश्रण थंड झाले कि आपल्याला ते मिक्सर मधुन बारीक करायचे आहे. त्या करता, छोट्या मसाला पॉट मध्ये भाजलेले तीळ, मिरची आणि लसूणाचे मिश्रण घालून त्यात चवीप्रमाणे साखर व मिठ टाकुन मिक्सर मधून बारीक काढून घ्या. याची आपल्याला पुड किंवा पावडर करायची नाहीये. थोडं जाडसरच मिश्रण असायला हवं. आपली तिळाची चटणी तय्यार आहे.


Also Read

शेंगदाणे लसूण चटणी (Shengdane Lasun Chutney)

टीप : खायला देतांना चटणीवर तेल टाकून द्यावे.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: