चमचमीत व्हेज हंडी अशी बनवा | Veg Handi Recipe in Marathi


व्हेज हंडी (Veg Handi) म्हणजे शाकाहारी भोजन घेणाऱ्यांमधली सर्वात आवडती भाजी. ही बनवायला अगदी सोपी असते आणि तुम्हालाही वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने घरी व्हेज हंडी कशी बनवायची हे बघणार आहोत.

Veg Handi
Veg Handi

व्हेज हंडी (Veg Handi) – साहित्य

  • दोन मध्यम आकाराचे लांब कापलेले कांदे
  • २ बारीक कापलेले टमाटर
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • एक इंच आल्याचा तुकडा
  • १/३ कप मध्यम तुकडे फुलकोबी
  • पाच ते सहा बीन्स
  • १/३ कप मटार
  • एक बारीक चिरलेले गाजर
  • १/३ कप कॉर्न दाणे
  • १/३ कप पनीर बारीक तुकडे कापलेले
  • एक लहान कांदा – ४ भागात कापून त्याच्या पाकळ्या वेगळ्या केलेला
  • १ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा हळद
  • १/२ अर्धा चमचा धने पावडर
  • १/२ अर्धा चमचा जिरे पावडर
  • १ एक चमचा किचन किंग मसाला
  • मिठ चवीप्रमाणे

कृती

व्हेज हंडी (Veg Handi) अगदी सोप्या पद्धतीने बनवण्यासाठी आपण याला तीन भागांमध्ये विभाजित करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण ग्रेव्ही बनवून घेऊ या. दुसऱ्या भागामध्ये आपल्याला जे व्हेजिटेबल्स आहेत ते थोडे शॅलोफ्राय करून घ्यायचे आहेत. तिसऱ्या भागांमध्ये आपण फायनल व्हेज हंडी बनवणार आहोत.

चला तर आपण आता पहिला भाग म्हणजे ग्रेव्ही कशी बनवायची ती पाहू. ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढईमध्ये दोन ते चार चमचे तेल गरम करा. तेल छान गरम झाले की त्यामध्ये लांब कापलेले कांद्याचे तुकडे टाका. हे तुकडे छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्या. लक्षात असू द्या तुम्हाला सतत चमचा थोडा ढवळत राहावा लागेल अन्यथा कांदे करपू शकतात. कांदे छान गुलाबीसर झालेत की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेले अद्रक आणि बारीक चिरलेले लसूण टाकायचे आहे. हे मिश्रण आता आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

कांदा-लसूण-अद्रक हे मिश्रण छान परतून झाले आणि कांद्याचा रंग थोडा गडद गुलाबीसर झाला की आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट, जिरे पूड, धने पूड, किचन किंग मसाला, हळद आणि थोडं मीठ टाकुन हे सर्व मिश्रण एकत्र करून एक मिनिट अजून परतून घ्या. गरज वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता म्हणजे मसाले करपणार नाहीत. मसाले छान परतून झाले की आता यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो टाकायचे आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

टोमॅटो टाकून मिश्रण एकत्र करून त्यात थोडं गरम पाणी टाका आणि ते मिक्स करून हे मिश्रण आपल्याला आता एक ते तीन मिनिटापर्यंत एक वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये मध्ये मिश्रण झाकण उघडून चेक करत रहा म्हणजे मिश्रण कढई ला लागणार नाही. तीन मिनिटानंतर आपले टोमॅटो शिजलेले असतील. हे मिश्रण आता आपल्याला एका प्लेटमध्ये का थंड करायला काढून घ्यायचे आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

थंड झालेल्या मिश्रणाला आपल्याला मिक्सरमधून एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. मिश्रण मिक्सरमधून काढताना गरज वाटल्यास तुम्ही थोडं पाणी घालू शकता. आपली एकजीव अशी ग्रेव्हीची पेस्ट तयार आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

Also Read

चमचमीत बटाटा वडा असा बनवा | Batata Vada Recipe in Marathi


आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. सर्वप्रथम आपल्याला फुलकोबी आणि कॉर्न दाणे हे ५० ते ६० टक्के पर्यंत शिजवून घ्यायचे आहे. त्याकरता एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यात चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद टाकून त्यामध्ये फुलकोबीचे तुकडे आणि कॉर्न दाणे थोडे उकळून घ्या. लक्षात असू द्या आपल्याला हे खूप शिजवायचे नाहीयेत. आपल्याला जस्ट ५०% पर्यंत कोबी आणि कॉर्न दाणे शिजवायचे आहेत. दोन ते तीन मिनिटांमध्ये हे कोबी आणि कॉर्न दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत.

Veg Handi
Veg Handi – Preparation

आता एका कढईमध्ये दोन ते चार चमचे तेल गरम करा. त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला गाजर आणि बीन्स हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. लक्ष असू द्या हे आपल्याला मोठ्या आचेवरच शॅलो फ्राय करायचे आहेत आणि सर्व भाज्या आपल्याला एकत्र शालो फ्राय करायचे नाहीयेत. कारण की जर आपण एकत्र शालो फ्राय केल्या तर काही भाज्या अति शिजून जातील आणि ते आपल्याला नको आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

तर सर्वप्रथम आपल्याला गाजर आणि बीन्स शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. एक मिनिटापर्यंत शालो फ्राय करून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर आपल्याला एक लहान आकाराचा कांदा जो आपण पाकळ्यांमध्ये वेगवेगळ्या करून घेतलेला होता तो शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला फक्त 30 ते 40 सेकंदापर्यंत शॅलो फ्राय करायच आहे आणि तो पण एका प्लेटमध्ये काढून घ्या. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आता गोबी आणि पनीर हे छान 40 ते 50 सेकंदापर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आणि शालो फ्राय करताना तुम्हाला कंटिन्यूअस चमचा ढवळत राहावा लागेल अन्यथा पनीर हे कडेला लागू शकतो. हे सगळे साहित्य आपल्याला आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

आता पण मेन ग्रेव्ही बनवायला घेऊ. सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा. तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी तडतडून घ्या. जिरे आणि मोहरी तडतडली की या स्टेजला आपल्याला आता एक छोटा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा छान लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची टाकायची आहे. लक्षात असू द्या, आपण ग्रेव्ही पेस्ट सगळ्यात पहिले जेव्हा बनवली होती तेव्हा आपण त्यामध्ये एक चमचा तिखट टाकलेले आहे. तर आता जे आपण तिखट टाकतो आहे ते आपल्याला काश्मिरी लाल मिरची टाकायची आहे कारण काश्मिरी लाल मिरची तिखट नसते, आपण ती फक्त कलर येण्यासाठी टाकतो आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

कांदा आणि तिखट तेलामध्ये थोडं परतून झालं की आता या स्टेजला आपल्याला आपण तयार केलेली ग्रेव्हीची पेस्ट टाकायची आहे. ग्रेव्हीची पेस्ट टाकून मिश्रण सर्वत्र एकत्र करून घ्या आणि या मिश्रणाला आपल्याला आता मंद आचेवर दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचे आहे. दोन ते तीन मिनिटानंतर मिश्रण शिजले की आता यामध्ये आपल्याला तयार भाज्या ज्या आपण शालो फ्राय करून घेतलेल्या होत्या, त्या टाकायच्या आहेत. या स्टेजला तुम्ही एकदा ग्रेव्हीची टेस्ट पाहून त्यात मध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर चवीप्रमाणे अजुन मिठ टाकु शकता.

Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation
Veg Handi
Veg Handi – Preparation

झाकण बंद करून मिश्रणाला एक वाफ येऊ द्या. गरज वाटत असेल तर मिश्रणामध्ये थोडे पाणी घालू शकता. आता आपल्याला याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिटापर्यंत वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढून झाली की मिश्रणामध्ये वरून तुम्ही थोडं क्रीम ऍड करू शकता. आपली व्हेज हंडी ही तयार आहे.

Veg Handi
Veg Handi – Preparation

तुम्हाला हि रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कंमेंट सेकशन द्वारे जरूर कळवा.


You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: